तू इतकी निरागस वाटलीस की तुझ्यात बुद्ध दिसले मला..


पीर बाबाच्या मजारीवर ,दुव्यांच्या  रांगानं मधे , मेंढरू  बनण्या  पेक्षा तू  फिरत राहिलीस
सुंदर नकली दागिने  आकर्षित करू  शकले नाही तुला
बंद शाळत गुलाबी कपड्यां मधे खेळल्या गेलेल्या शेवटच्या दिवसाच्या आठवणी
कुणाच्या शोधात गेली  गुल मकई  पीर बाबाच्या मजारी वर ?
खरं -खरं सांग कि काय आपल्या शालेवर तालिबान वार करेल ?


प्रश्न ठेवलास तू जगासमोर आपल्या मैत्रिणीचा
नाही लिहिलं उत्तर डायरीत
तुझे जवाबी शब्द
बुद्धा  जवळ आपल्या हरवलेल्या  ताकतीसाठी गेले होते काय ?
कि तू ठेवले  होते आपल्या गुल्लक मधे जेणेकरून अड़ल्या वेळी कामात येतील ?
कुठे आहेत ते जवाबी शब्द ,गुल मकई ........

मलाला ,तु इतकी मासूम वाटली मला की तुझ्यात बुद्ध दिसले मला
बामियान मधे तोफांनी ध्वस्त नाही होवू शकले  बुद्ध
कोण मिटवू शकले धरती वरुन बुद्धा  ला
मग तूलाही ध्वस्त नाही करू शकणार कोणी ही  ,गुल मकई !

तुझ्या सोबत च्या मुलीना माहिती आहे  फेब्रुवारीत सुरु नाही होऊ शकणार शाला
त्या चालल्या जातील स्वात ची घाटी सोडून ,बेनाम कस्ब्याँमधे
भेटू शकणार नाही ,हे ठाऊक आहे मुलींना आणि म्हणुन खेळतात मैदानात
किंबहूणा,वातावरणात पसरला आहे तालिबान ....तालिबान ....तालिबान ......

तालिबान आपल्याकडे शास्त्रा मधून ,पुराणान मधून निघालेला
समाजाच्या नस -नसातुन मेंदूवर  ,जिभेवर ,लपून करतो
गुरिल्ला वार....कोण जाने किती वेळा मारले जातात ,पुन्हा जीवंत होतात
मलाला,तुझ्या डोक्यात गोळी मारून विचार करतात ते की मारून टाकल तुला
एक सारखीच रणनीति आहे तुझ्या आणि आमच्या तालिबानांची

दिमागा  वर वार करा ,बाकि युद्ध ..वार ...जिंकुनच घेऊ .....सहजच
युद्ध भूमि बनवून टाकलेल्या जागी शिकतेस .....खेळतेस
किती कठिन असते तेव्हा ,आणि जेव्हा माहित असते कि आज शाळचा शेवटचा दिवस
पुन्हा नाही उघड़णार शाला ..सगळ जाणतेस आणि खेळतेस
शेवटचा दिवस शालेय जीवनाचा ........
........कोणता खेळ आहे हा तुमचा देशी -विदेशी तलिबान्यानो

मलाला, खेलाच नाव माहित आहे मला
त्या
ह्या ..........खेलाच
एका पायावर खेलत असशील दुसरयाला स्पर्श करण्याचा खेळ
बनवून कपड्याचा चेंडू साधत असशील नेम
काही फरशी च्या तुकड्यांना एक दुसरयावर रचून , पाडत असशील
हसत असशील , खुप सारं प्रेम आणि उन्मुक्ततेनं
गुंजन उठत असेल स्वात च्या घाटित
भिडत असतील कितीतरी पहाड़
शेवटच्या दिवसाच्या हास्य भरलेल्या आनंदाने
घाबरत असतील , मन थरारत असेल .तालिबान्यांच

गुल मकई ,

आमच्या इथे ही मनभरुन हसत नाहीत मुली
खेलतात
स्मित हसतात
आणि पेपरातुन माहित पड़ते कि मारल्या जातात
होतो बलात्कार
ह्यापासून वाचण्यासाठी फतवा निघतो तालिबान्यांचा ,मलाला
कि करून टाका पंधरा  च्या वयात लग्न
सहा  वर्षाची कि आठ कि अकरा वर्षाची ही मुलगी वाचू शकत नाही
हैवानांपासुन,
त्यांच काय करावं तालिबान्यांनो ?

गुल मकई

विसर पडतो कि महाज्ञानी विश्वाच्या पथ प्रदर्शक देशाचा आहे मी
जिथे सर्व कही जाणतात
म्हणुन तर मुलींना गर्भातच मारतात
वाढली तर हूंडया साठी जाळतात
मनात आलं तर बलात्कार करून नाल्यात फेकून देतात
पिता, पति किंवा पुत्राच्या अधीन राहण्याचा हुकुम आहे
आणि सगळ्या कडून पालन करवून घेतात
तरीच मन्दिर प्रवेश वर्जित आहे
कोणीही नाही जाणत कि का होते आहे तालिबानी आदेशांच पालन
कि मन्दिर प्रसादाच काम महिलांच्या समुहाला नाही दिलं जाणार
कि त्या अपवित्र असतात ,पवित्र देशाच्या पावन पुरुषांच्या देशात

हैवानांनों,
तालिबान्याना
पैदा करणारया आयांनो
संरक्षणकर्ता ,बाप दादांनो ........
केव्हा आणि कशी वाचेल गुल मकई......
का नाही जगु देत त्यांना मनमौजीने
मनमानी ने
खुलुन हसन्याने
कि गुंजून उठेल
कटकटपूरा ते स्वात घाटी
का  घाबरता  .....?

मलाला,तूला अणि तुझ्या आईला आवडते ,गुल मकई नाव
परन्तु शालेत टाकलं आहे मलाला.....
नाव काय असावं  ?
इथे ही ठरवत नाहीत आया आपल्या लाडकी चं
आवडीचं नाव ही ठेवायला घाबरतात
म्हणुन  ठेवतात "मलाला " ज्याचा अर्थ आहे
"शोक मधे डूबलेला माणूस "

गुल मकई ,
आमच्या कड़े खैरलांजी पासून ते मिर्चिपुर पर्यंत
मारल्या जातात मुली प्रियंका असो वा सुमन....
गुवाहाटीची मुलगी ते इरोम पर्यंत ...
चुप राहतात कारण त्यांची लेक नाही आहे ती
त्या पोरीशी काय घेण देण
विकासाचे आंकड़े ,हाई वे ,रोप वे  ह्या सगळयात
कोण्या वे ची गोष्ट कथा सांगतो आहे?

गुल,
मला कळत नाही आहे ..
डायरी मी पण लिहूं इछितों
नोंद करायचे  आहे मला पण
प्रताडनेचे तमाम तीर

आता कालच दुर्गाशी बोललो होतो
फेसबुकच्या संसारात
दहावी पास नाही करू शकली ती
ज्याला जितकं वाटलं तितकं शिकावं
अस स्वप्न पाहतो आणि आज समझलं
तुझं स्वप्न पाहिलं  मी
तापात ...
असं वाटतं अजून ही नाही उतरला ताप माझा .
असाच राहू दे  आयुष्यभर ताप माझा
पण
गुल मकई
तुझं जीवंत रहाणं आवश्यक आहे .
.....मूल कविता --कैलाश वानखेड़े ....अनुवाद --उज्वला

No comments: