Monday, October 15, 2012

कविता "कहाँ जाओगी, दुर्गा" का मराठी अनुवाद

कुठे जाणार, दुर्गा 

जळत आहेत डोळे आता कि अजुन वाचला नाही मी पूर्ण पेपर
फेसबुक चे सारे अपडेट्स सुद्धा पाहू-वाचू शकलो नाही
बस्स दिसली फोटो दुर्गा ची
संदीपच्या वाल-वरून उदयप्रकाशच्या कविते पर्यंत येता-येता माझ्या डोळयात धुंदी आली
नकारत आहे कोणी माझ्या आतून
चल गोळी खा, झोपी जा



झोपत आहे अडीच हजारां पेक्षा जास्त वर्षांपासून
त्यांची अफू फार परिणामकारक आहे
झोपू घालते, विसर पाडते
गुपचुप देते मुलीला नावं
पीटते दवंडी बलाढय होण्याची----
की नावात किती ताकत असते
की चमकदार, चमचमीत बैग उचलताना
खांदे वाकून जातात कळतचं नाही कि, इतके भारी असेल

बोलणारा बोलतो चार बैगचे साठ रुपे..
बरं असू दे मीच उचलतो
तुला पाहून वाटल चार पैशे ईमानदारी ने कमवशील
इकडे-तिकडे गुंडां पासून वाचून राहशील
नाही तर, तुझे भोळे वय
भारी पडेल, बघत नाही टीवी
किती रेप...
त्यामुळेच म्हणतात पंधरा च्या वयात कन्यादान करा
मौज-मस्ती करा अणि भड्व्यांशी डिमांड करा
पंधरा च्या नाजुक काया ची


बैगवाला पुटपुटतो
चल घे पन्नास, ठीक आहे

दुर्गा उचलते बैग, तर कंबरे वर जोर पडतो
पाठ नकार देते
पण जीभे मुळे मुकाटयाने चालत राहायला सांगतोय मेंदू

गुटखा, कफ मिश्रीत थूंकी, घाण लांबट लपलपीत निघते
तो पटकन पटकतो त्याला पटरी वर
विचार करतो त्यानं नाही केलं घाण प्लेटफार्म ला
फक्त सोडूल दिलं त्याला मरण्या साठी पटरी वर
त्याच्या लायकीच्या जागे वर

इतके ओझ पन्नास रुपयात.... मूर्ख बनविले
सगळ्या लोकां सारख
आम्ही तर अडीच हजार वर्ष पासून अस मूर्ख बनत आलो
तू काय आहेस दुर्गा?

तो हासतो की कफयुक्त लांबट बेरंग चिकट लाळ
पडते पीटर इंग्लैंड च्या शर्ट वर
की धावतो पाण्यासाठी पाणपोई जवळ
पाणी नाही
पाणपोईत
माणसा ला माहीत नाही की पाणी नाही त्याच्यात सुद्धा
बडबडतो, आता हिला ही प्रायव्हेट सेक्टर ला देऊन टाकले पाहीजे
ते लावतील आधुनिक यंत्र जे लाळ काढून घेईल
जसे थ्री ईडीयट मधे निघते बाळ
वॅक्युम क्लिनर मधुन
माझ्या वशात असले असते तर
तर काढून टाकेन या देशातून.... कोणाला?

मुलाच्या मेडीकल प्रवेशासाठी द्यावे लागते साडे तीन कोटी
स्साले..... मानलेचं नाहीत एवढ्या वशील्या नंतर ही
म्हणतात तुमच्या मुलाचे गुण, मोजण्या सारखे सुद्धा नाहीत
तुम्हाला दिले कारण देसाईं बोलले होते म्हणून...

बैग पाहतो, कुठे गायब तर झाली नाही ना..
स्वस्त मजूर, मजूरच राहावे जन्मभऱ
पिढ्या दर पिढी
तर एडमीशन साठी नाही द्यावे लागले असते साडे तीन कोटी

त्यापेक्षा या गाढ्वाच लग्न केलं असतं, घेतलां असतां खूप हुंडा
पण या कोटे सिस्टम न कुठंलच नाही ठेवल

येतात
हेच बघा, एवढ्या ओझ्या साठी घेतले पाहिजे दिढ शे
पण खुश झाली पन्नास वर
याना अक्कलचं नाही
जी आमच्यात आहे
आहे आमच्यात योग्यता
हुशारी तर आमच्या रक्तात आहे नसा-नसात आहे
इतकी आहे की मुत्रीघरात विसर्जित करावी लागते
जानवे लटकवुन

मुत्री वरून त्याला मॉल ची आठवण आली की जसं मुलां साठी असते ट्राली
तसी स्टेशन वर पाहिजे, मोठयांसाठी
राजी आहोत आम्ही पैशे द्यायला की रोजगार मिळु शकेल
हे तेव्हाच होईल शक्य जेव्हा प्रॉयव्हेट सेक्टर कडे वळेल रेल्वे
तेव्हा कुणी म्हणणार नाही की माणसाला बनविले मशीन
की क्रूर आहे
सांगा कोणी बोलतात का राजधानीत, सायकल रिक्शे पाहुऩ
इथे बिहारी आले तर.. आपली मजाचं- मजाचं
याचा बाप इथे असता तर त्याच्या खांद्या वर बसूण निघालो असतो स्टेशनच्या बाहेर
पण कमविण्याची समज असली असती तर, असती अक्कल

का शिकत नाही दुर्गा
काय करतात तुझे वडील
काय मजबूरी आहे की
हमाल बनली तू तिथे, जिथे आहेत दाट वन
वनात असतात पुष्कळ फळे, औषधी...

प्रश्न नाही करत बैग वर नजर ठेवणारा मुला साठी साडे तीन कोटी देणारा
तुम्ही करता?

घेणारा कुठे ठेवत असेल
कुणा-कुणाला वाटत असेल
त्याचा मुलगा काय करत असेल .....

कोणी नाही करत प्रश्न

मी ही चूप आहे कारण मी लिहित आहे

एवढं लिहिले आहे की
आम्बेडकरचं आम्बेडकर दिसतात मला
सांगितल न की ताप आहे
जळत आहेत डोळे
वाचू शकत नाही
की लिहितो
की लिहू शकलो बाबासाहेबा मुळे
की बुध्द, कबीर, फुले ,सावित्री, पेरीयर आहेत माझ्या सोबत
विचारण्याची इच्छा आहे, तुझा सोबत कोण आहे दुर्गा?

की बैगवाला स्वार होतो
जो आठवण करतो काही वस्तु विसरली तर नाही ना
तो हासतो की हुशार आहे म्हणून विसरला नाही
जास्त शिकला नाही तर काय?
बापाची संपत्ती होती एवढी की नोकरी करण्यापेक्षा
ठेवले किती तरी नोकर
या नालायकाला या वयात ही अक्कल आलीच नाही
काम-धंदा शिकला नाही, नाही शिकू शकला मुलगा
कधी-कधी वाटते याची डीएनए चाचणी करायला हवं

''कुठे जायाचे साहेब'' तंद्री मोडतो रिक्षावाला
''बालाजी मंदीर, काय घेणार''
''ईश्वरपाशी जात आहात, द्या जितकी तुमची श्रध्दा भक्ति''
''मूर्ख समजतोय मला, सरळ बोल काय घेणार?''
''दोन शे लागतात... पहिलांदा आलात वाटत, सगळयांना माहीत आहे''
''शंभर.... नाही तर मी चाललो टांग्याने.... घोडे स्वार''
''तूच ठेव... टांग्याने का जात आहेस.....पायाने जाशील तर काहीच नाही लागणार...''
''जपून बोल....'' दुर्गा ला बघतो. मनातल्या मनात बोलतो बघा तरी किती भाव वाढले..
त्याला भावाची आठवण येते जेव्हांच जेंव्हा तो कार मधे टाकतो पेट्रोल, किती भाव वाढले यांचे....
''शंभर बोलण्या आधी विचार करायला हवा होता, आम्हाला जपून बोलायला सांगतोय... चल हो बाजुला''
मनात येते दोन मारू....त्याचा देह पाहून इरादा बदलतो आणि
पन्नास चे गाँधी चे नोट पुढे करतो दुर्गा समोर
दुर्गा आपल्या डोक्यावर ठेवलेला मान, कंबर वाकणार्या 'अमेरिकन टूरिस्ट'' ला खाली उतारण्याचा प्रयत्न करते की
त्याचा हात करतो मनाई
धपकन....
अमेरिकन टूरिस्ट पडल्यावर, त्याला वाटते त्यालाच पाडले
धुळी माखलेला गांधी नोट त्याच्या हातून सुटून गेला होता
बडबडतो
बायकांनी कोणतेच काम व्यवस्थित होत नाही
त्यांची जागा किचन किंवा बेडरूम मधेच आहे

दुर्गा
माझे डोळे जळत आहेत
की तापेने तापत आहे
आणि मी वाचू शकत नाही 'नई दुनिया'
ज्याचा पेज थ्री वर लिहिल आहे शहराचा रस्ता ठीक नाही
धुळी आणि खड्डे पाहून ग्लोबल इंवेस्टर कसे मीट करणार
कशे होईल आयोजन? वाचले आहेत सतरा दिवस.... मंत्री जी, पेपर, साहेब सगळयांच्या
वाजवी चिंतेच्या मध्ये तू, तुझे फेस आहे फेसबुक वर

मुक्तिबोधांच्या दुविधेत आहो किती दिवसापासून
कुठे जावं, उज्जैन किंवा दिल्ली

मी राज्य-घटनेवर विश्वास ठेवून
निश्चय करतो
दुर्गा खर खर सांग
तुझापाशी काय आहे विश्वास करण्यासाठी...

-------------------------------------------

मूल हिन्दी रचना : कैलाश वानखेड़े .. मराठी अनुवाद : पुष्पेन्द्र फाल्गुन .....
अनुवाद सहयोगी ...विनायक काले


2 comments:

vinayak kale said...

अनुवाद में कुछ गलतियाँ हैं। इसे पोस्ट करने से पहले किसी मराठी के अध्यापक को दिखा देते, तो अच्छा होता। अनुवाद के लिए आपने काफी मेहनत की हैं, इसलिए आप बधाई के पात्र है। गलतियाँ बहुत कम है, पर ये गलतियाँ कविता के प्रवाह में बाधा डाल रही है। मुझे लगता है, आप इसमें जरूर सुधार करेंगे। बधाई

kailash said...

aapke sanshodhan ke saath...

झोपड़पट्टी के मासूम फूलों का झुंड

                     जिंदगी,झोपडपट्टी की अंधेरी संकरी गलियों में कदम तोड़ देती है और किसी को   भी पता नहीं चलता है।जीवन जिसके मायने किसी को भ...